Wednesday, 31 May 2017

बायोगॅस म्हणजे काय?

ह्यामध्ये मुख्यतः हायड्रोकार्बन्स असतात, ते ज्वलनशील असल्याने जळताना उष्णता आणि उर्जा उत्पन्न करतात. एका जैव-रासायनिक क्रियेमधून हा वायू उत्पन्न होतो. ह्या प्रक्रियेच्‍या दरम्यान काही विशिष्ट प्रकारचे जीवाणू म्हणजे बॅक्टेरिया जैविक कचर्‍याचे रूपांतर उपयुक्त अशा बायोगॅसमध्ये करतात. जैविक प्रक्रियेमुळे हा वायू उत्पन्न होत असल्याने ह्याला बायोगॅस असे म्हणतात. मिथेन हा वायू बायोगॅसचा मुख्य घटक असतो.

बायोगॅस निर्मितीची प्रक्रिया

बायोगॅस निर्मितीची प्रक्रिया अनएरोबिक प्रकारची असते आणि ती दोन चरणांत घडून येते ती दोन चरणे म्‍हणजे आम्लनिर्मिती (अ‍ॅसिड फॉर्मेशन) आणि मिथेन वायूची निर्मिती. आम्लनिर्मितीमध्ये, कचर्‍यामधील जैव-विघटनयोग्य जटिल सेंद्रीय संयुगांवर आम्ल तयार पातळीवर सेंद्रीय आम्ले हाच मुख्य घटक असल्याने तिला आम्लनिर्मितीची पातळी असे म्हणतात. दुसर्‍या चरणात, मिथॅनोजेनिक प्रकारचे जीवाणू सेंद्रीय आम्लांवर क्रिया करून मिथेन वायू बनवतात.
करणारे जीवाणू आपले काम सुरू करतात. हे जीवाणू कचर्‍यातील विष्ठेमध्ये राहतात.

No comments:

Post a Comment